तीन वर्षानंतर 42 जीप कर्मचाऱ्यांना पदोन्नती
जालना- जालना जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीला आज मुहूर्त मिळाला. तब्बल 42 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची ही लॉटरी लागली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरे -चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती .
परिचर वर्ग चार मधून 10 कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक वर्ग श्रेणीतून 19 कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक पदावरून कनिष्ठ प्रशासन अधिकारी 10 कर्मचारी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहाय्यक प्रशासन अधिकारी एक अशा एकूण 42 कर्मचाऱ्यांना ही पदोन्नतीची लॉटरी लागली आहे.
हे आहेत ते कर्मचारी नावापुढील ठिकाण हे सध्याचे कार्यरत ठिकाण आहे. कनिष्ठ सहाय्यक श्रीमती एस. एस. घुले जिल्हा परिषद प्रशाला खासगाव, ए. जे. शेजुळ प्राथमिक आरोग्य केंद्र केदारखेडा ,श्रीमती एस. जी. पराड जिल्हा परिषद उपविभाग बांधकाम जाफराबाद, एस. व्ही. मडावी प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी, श्रीमती व्ही. एस. घनवटे जि. प. प्रशाला सातोना, श्रीमती डी.पी .ढोले जि. प. प्रशाला खासगाव, श्रीमती पी. एस. उल्लेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र सातोना, एस. एन. पवार पंचायत समिती अंबड, एस. एम. मळेकर जि. प. प्रशाला वालसावंगी, के. पी. सुरवसे प्राथमिक आरोग्य केंद्र शहागड, वरिष्ठ सहाय्यक एस. के .खंदाडे एकात्मिक बालविकास सेवा योजना जाफराबाद, श्रीमती पी. एन. शिंदे पंचायत समिती जालना, श्रीमती एम. ए. जोशी उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा जालना, ए. बी. जाधव पंचायत समिती भोकरदन ,एस. यु .मोरे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जालना, के. बी. बोऱ्हाडे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जाफराबाद, आर.बी. वाघमारे महिला व बालकल्याण विभाग जालना, एस. एम. भताने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटूर, डी. आर. वडगावकर आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना, श्रीमती व्ही.जी परदेशी महिला व बालकल्याण विभाग, एस. सी. देशपांडे प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव, श्रीमती एम. आर. जाधव बांधकाम विभाग जालना, डी. वाय. भुजंग उपविभाग ग्रामीण पाणीपुरवठा अंबड, के. ए. सोनवणे पंचायत समिती भोकरदन,जी.जी.जपे कृषी विभाग जिल्हा परिषद जालना, आर. आर. बारड शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर. बी. गडदे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जालना, श्रीमती वाय. पी. इंगळे बांधकाम विभाग जालना, एस. एम. फुलारी पंचायत समिती अंबड, ए. एस. गाडेकर पंचायत समिती बदनापूर ,आर बी. ढोले पंचायत समिती अंबड ,जी.एस. लोखंडे पंचायत समिती जाफराबाद, एन. बी. श्रीमंगले उपविभाग अंबड, एस. एस. चव्हाण आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना. सहाय्यक प्रशासन अधिकारी मधुकर राठोड पंचायत समिती मंठा यांना पदोन्नती मिळालेली आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com