Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » “गे ऍप” मुळे झाला “गेम” मित्रासोबत समलिंगी तर त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध.शेवट खून
    Jalna District

    “गे ऍप” मुळे झाला “गेम” मित्रासोबत समलिंगी तर त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध.शेवट खून

    EdTvBy EdTv21/04/2023No Comments2 Mins Read4 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना; बँकेची वसुली करणाऱ्या प्रदीप भाऊराव कायंदे वय वर्ष 40 यांचा दिनांक 8 एप्रिल रोजी मंठा शहरात खून झाला होता. दरम्यान या खुनाचा तपास लावण्यात मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना यश आलेआहे. प्रदीप कायंदे यांचा खून” गे ऍप”च्या माध्यमातून त्यांचा मित्र सोपान बोराडे यांच्यासोबत समलिंगी संबंध आणि त्याच्याच पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, आणि आरोपींनी तशी कबूलही दिली आहे.


    देऊळगाव राजा परिसरात राहणारे प्रदीप भाऊराव कायंदे हे जालना शहरात एका बँकेची वसुली करत असत, ते रोज जालना ते देऊळगाव राजा जाणे- येणे करायचे, दरम्यान सात तारखेला ते जालन्याहून देऊळगाव राजाला न जाता मंठा येथे पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात डाटा एन्ट्री करणारे ऑपरेटर त्यांचे मित्र सोपान बोराडे यांच्याकडे गेले. या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून “गे ऍप” द्वारे मैत्री झालेली होती, आणि दोघांमध्ये समलिंगी संबंधही होते. या समलिंगी संबंधाचा फायदा घेत प्रदीप कायंदे यांचे सोपान बोराडे यांच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध जुळले. सात तारखेला प्रदीप कायंदे हे बोराडे यांच्या मंठा येथील शांतीनगर येथील घरी गेले आणि मुक्काम केला.

    दरम्यानच्या काळात दोघांमध्ये भांडण झाले आणि सोपान बोराडे तसेच त्यांचे होमगार्ड असलेले भाऊ प्रकाश बोराडे यांनी इतरांच्या मदतीने प्रदीप कायंदे यांना मारहाण केली आणि त्यांचा खून केला. त्यानंतर प्रदीप कायंदे यांचे प्रेत बाजार समिती परिसरात आणून टाकले. आठ तारखेला ही घटना उघडकीस आल्यानंतर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या प्रकरणाचा अवघ्या सहा तासात छडा लावला आणि पुरावे शोधण्यासाठी त्यांनी मोबाईल रेकॉर्डिंग, छायाचित्र ,व्हिडिओ चित्रीकरण ,अशा प्रकारचे भक्कम पुरावे जमा केले.
    दरम्यान या खुनाची सोपान बोराडे आणि प्रकाश बोराडे यांनी कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी आसमान शिंदे, संतोष बनकर, मांगीलाल राठोड, दीपक आडे ,शाम गायके, प्रशांत काळे, सुनील इगल आदींचा समावेश होता.

    दिलीप पोहनेरकर,9422219172
    https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    अनैतिक संबंध खून गे अँप मंठा पोलीस समलिंगी संबंध
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleतीन वर्षानंतर 42 जीप कर्मचाऱ्यांना पदोन्नती
    Next Article “पहिल्या धारेवर” पहाटे पाच वाजता स्थानिक गुन्हा शाखेचा छापा; चार लाखांचे सडके रसायन नष्ट
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/2026

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/2026

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    18/06/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,106 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,128 Views

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    22/06/20262,134 Views

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    24/06/20261,669 Views
    Don't Miss
    Breaking News 24/06/2026

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    जालना-गेल्या तीन वर्षांपासून रेवगाव येथील शेतकरी लक्ष्मण कदम यांना वेगवेगळे आदेश काढत जालनाच्या तहसीलदारांनी झुलवत…

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्यावर;उद्योजक घनश्यामदास गोयल यांची निवड

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कोण जिल्हाधिकारी?तहसीलदारांचा अजब फंडा, उद्याच्या तारखेच्या पत्रात आज हजर राहण्याचे आदेश!

    उद्यापासून शाळा एकाच सत्रात

    जि.प.च्या गटशिक्षणाधिकाऱ्याला वाढीव वर्गाची “एलर्जी”?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.