जालना-विवाहितेच्या मृत्यू प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी विवाहितेच्या नातेवाईकांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मंठा तालुक्यातील आंबोडा कदम येथील वर्षा आकाश चव्हाण या विवाहितेने दिनांक 19 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या सासरच्या आठ जणांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आलेला आहे, आणि दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींना अटक करावी अशी त्यांची मागणी आहे.
मंठा तालुक्यातील चिखली तांडा येथील मोहन बंडू राठोड वय 40 वर्ष यांची मुलगी वर्षा हिचा विवाह दिनांक 14 मे 2021 रोजी अंबोडा येथील आकाश विठ्ठल चव्हाण यांच्यासोबत झाला होता .काही दिवस संसार सुरळीत चालू होता, त्यानंतर” मुलगी पसंत नाही, तुला आम्हाला सोडायचे आहे” असे म्हणत सासरच्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला आणि गर्भपातासाठी देखील दबाव आणू लागले. या प्रकरणातून विवाहिता दोन वेळा माहेरी देखील आली होती. त्यानंतर दोन्ही कडील मंडळी एकत्र येऊन तडजोड झाली आणि मुलीला पुन्हा नांदविण्यासाठी सासरी पाठविले .दरम्यान 17 मे रोजी चिखली तांडा येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी वर्षा आणि जावई आकाश यांना बोलावले होते .हा कार्यक्रम आटोपून हे दोघेही परत गावाकडे गेले आणि 19 तारखेला आंबोडा कदम येथील मधुकर सरपंच यांनी वर्षाने गळफास घेतल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना दिली. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 19 रोजी भादवी कलम 498A आणि कलम 304A नुसार आकाश विठ्ठल चव्हाण, निखिल विठ्ठल चव्हाण, बाळू लक्ष्मण पवार, लक्ष्मण रूपा पवार, आणि अन्य चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी आज वर्षाच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
वर्षभरापूर्वी दिली होती तक्रार!
वर्षा आकाश चव्हाण या विवाहितेने दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये सासरची मंडळी पैशासाठी छळ करीत असल्याचेही म्हटले होते, तसेच गर्भपात करण्यासाठी दबाव आणला आणि 14 दिवस दाबून ठेवले असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला होता. यामध्ये देखील वरीलपैकी सात आरोपींची नावे आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com