Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

जि.प.च्या 942 शाळांना मिळणार प्रथमोपचार पेटी

जालना- जिल्हा परिषदेच्या 942 शाळांना प्रथमोपचार पेटी देण्यात येणार आहे .याची सुरुवात आज जालना जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांचीही उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेच्या उपकारातून तरतूद केलेल्या आठ लाख रुपयांच्या 942 प्रथमोपचार पेटी खरेदी करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या जास्त आहे अशा शाळांना  या पेट्या देण्यात येणार आहेत. एकूण 1506 शाळा आहेत त्यापैकी मिळालेल्या अनुदानातून 942 पेट्याच खरेदी करता आल्या आहेत . या पेट्यांमध्ये विविध प्रकारची 11 औषधी आहेत .जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे साहित्य खरेदी करण्यात आला आहे, आणि याचा वापर शिक्षकांनी योग्य पद्धतीने करावा असे आवाहन श्रीमती वर्षा मीना यांनी केले आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button