कॉफी शिवाय “समथिंग”; पाचशे रुपये तास :पाच जोडपी ताब्यात; सदर बाजार पोलिसांचा छापा
जालना- शहरातील मध्यवस्ती असलेल्या आझाद मैदान परिसरात महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि इथेच कॅफे थिंकिंग कप या नावाचे एक कॉफीचे दुकानही आहे. या चौकामध्ये विविध प्रकारची महाविद्यालयीन क्लासेस घेणारी कोचिंग क्लासेस आहेत .त्यामुळे परिसरात तरुण-तरुणींची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. याचाच फायदा घेत कॅफे थिंकिंग कप या कॉफी चालकाच्या दुकानदाराने सांकेतिक भाषेमध्ये बोर्डावर,”something more then cafe” (समथिंग मोर द्यान कॅफे) असे लिहिले आणि नेमकं कोणतं समथिंग आणि कॉफी शिवाय मिळतं हे पाहण्यासाठी तरुण-तरुणींची इथे गर्दी व्हायला लागली .
या गर्दीचा फायदा घेऊन हॉटेल चालकाने एका जोडीसाठी पाचशे रुपये तास असा भावही निश्चित केला . त्या अनुषंगाने इथे महाविद्यालयीन तरुण-तरुणी रेंगाळायला लागल्या ,याची भनक सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना लागली आणि गेल्या अनेक दिवसांच्या हेरगिरीनंतर आज या कॅफे सेंटरवर छापा मारला.यावेळी पाच महाविद्यालयीन तरुण-तरुणी नको त्या अवस्थेत या कॅफे सेंटरमध्ये पोलिसांना दिसून आले आहेत. त्यामुळे पालकांनो सावध व्हा आणि आपले पाल्य क्लासेस आणि महाविद्यालयाच्या नावावर कुठे जात आहेत याची चौकशी करा.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172