भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांनी केली जाळपोळ -लाखे पाटील; आपल्याला राजकारण करायचे नाही तपासाचे काम पोलिसांचे;ऍड.अर्जुन राऊत. एकाच व्यासपीठावरून आरोप आणि खंडन
जालना- मराठा आरक्षणावरून दोन दिवसांपूर्वी झालेली जाळपोळ आणि दगडफेक ही मनोहर भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे कार्यकर्ते घुसून ती घडून आणली आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान याच वेळी याच व्यासपीठावरून ऍड. अर्जुन राऊत यांनी या आरोपाचे खंडन केले आहे आणि यामध्ये आपल्याला राजकारण करायचे नाही ते कार्यकर्ते कोण होते? कोणत्या पक्षाचे होते ?हे आपल्याला माहित नाही ते तपासण्याचे काम पोलिसांचे आहे असे सांगून लाखे पाटलांच्या आरोपाशीचे सहमत नसल्याचे ते म्हणाले.
आज मराठा समाजातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाच्या तरुणांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत ही प्रमुख मागणी करण्यात आली त्यासोबत दिनांक 16 रोजी पुन्हा मुख्यमंत्री शासन आपले दारी या निमित्ताने शहरात येत आहेत त्यावेळी बहुसंख्य मराठा समाज पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी रेटून धरणार असल्याचेही लाखे पाटील म्हणाले. दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे भिडे गुरुजींचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या असतील तर त्यांना काय म्हणणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Edtv jalna news App on play store, web-www.edtvjalna.com ,yt-edtvjalna