जालना -राष्ट्रवादी ही तुमची -आमची नाही तर राष्ट्रवादीही आमचीच आहे. आमची सदस्य नोंदणी आहेत असा दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल चव्हाण यांनी आज केला .

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या गळ्यात पडली आणि आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा जालन्यात घेण्यात आला .या मेळाव्याला राहुल चव्हाण मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. शहरातील एका हॉटेलला झालेल्या या मेळाव्यापूर्वी छत्रपती संभाजी उद्यानापासून एक रॅली काढण्यात आली. या रॅली नंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री .चव्हाण बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाडा विभाग अध्यक्ष दत्ता भांगे, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती खांडेकर, युवा संघटक ज्ञानेश्वर सरकटे ,रवींद्र तौर आदींची उपस्थिती होती. दरम्यान अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीप्रमाणे यावेळी देखील रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री .चव्हाण यांनी सांगून महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याचेही त्यांनी सांगितले.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version