जालना- सावकाराकडून घेतलेले कर्ज वेळच्यावेळी फेडले परंतु दिलेल्या रकमेची पावती कधी त्यांनी दिली नाही, शेवटी सर्व शेती सावकाराच्या नावावर करून दिली. त्यानंतरही त्या शेतीचे उरलेले पैसे सावकाराने दिले नाहीत असा आरोप करत मंठा तालुक्यातील भगवान काळे या शेतकऱ्याने आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान 2018 मध्येच हे प्रकरण निकाली निघाले आहे आणि या संदर्भात भगवान काळे यांनी त्यानंतर कुठलाही पत्रव्यवहार न करता किंवा कोणतीही पूर्व सूचना न देता आज अचानक विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.
या संदर्भात दिनांक सहा ऑगस्ट 2018 रोजी भगवान काळे यांची पत्नी सुरेखा काळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती, या तक्रारीमध्ये पाटोदा येथील गट नंबर 159 मधील क्षेत्रफळ वीस आर व गट नंबर 160 मधील 22 आर जमिनीच्या वाटण्या झाल्या नाहीत, परंतु भगवान काळे यांना दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांनी सुंदरराव वायाळ यांच्याकडून पाच रुपये प्रति शेकडा प्रमाणे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते .या बदल्यात सुंदरराव वायाळ यांना 2014 पर्यंत प्रतिवर्षी साठ हजार रुपये दिलेही होते .परंतु वायाळ यांनी कोणतीही पावती दिली नाही. कर्जाच्या घेतलेल्या रकमे रकमेपेक्षा चार पट रक्कम देऊनही दिलीप वायाळ हे लिहून घेतलेली शेतजमीन परत करत नव्हते .खरंतर ताबा हा सुरेखा काळे यांचा होता. असे असतानाही वायाळ यांनी खरेदी खत करून ही शेत जमीन स्वतःच्या नावावर केली आणि सातबाराला नाव लावले. भगवान काळे यांना दारूचे व्यसन असल्यामुळे सुरेखा काळे यांना जीवन नकोसे झाले आहे.वायाळ परिवारातील पाच जण अशाच प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करतात आणि खरेदी खत लिहून घेतात ,हे खरेदी खत लिहून घेतल्यानंतरही व्याजाची रक्कम काढून घेऊन उरलेली रक्कम अद्याप पर्यंत दिली नाही. या कारणासाठी आज भगवान काळे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला सुदैवाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी वेळेत कार्यालयात आल्यामुळे त्यांनी लगेच काळे यांच्या हातातून विषाची बाटली काढून घेतली आणि दुर्घटना टळली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी देखील घटनास्थळी घेऊन धाव घेऊन भगवान काळे यांना रुग्णालयात भरती केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172