जालना- जिल्हा नियोजन कार्यालयात नियमानुसार शासकीय बदली झालेली असतानाही कामावर हजर करून न घेणाऱ्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याची तक्रार थेट महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. दरम्यान सहा दिवस या महिला अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कचेरीच्या पायऱ्या लागल्या झिजवाव्या लागल्या.

 

महाराष्ट्र शासनाच्या लेखा वित्त विभागाने क्रांती वाघमारे यांची जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या जिल्हा नियोजन कार्यालयामध्ये लेखाधिकारी म्हणून बदली केली होती. या बदलीच्या अनुषंगाने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी श्रीमती वाघमारे या घराचे सामान घेऊन जालन्यामध्ये स्थलांतरित झाल्या आणि नियोजन कार्यालयामध्ये हजर होण्यासाठी गेल्या .परंतु तेथील जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी त्यांना हजर करून घेण्यासाठी टाळाटाळ केली. थोडे थांबा ,असे ते म्हणत. परंतु किती थांबा हे न सांगितल्यामुळे महिला अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यातच त्यांनी घरही जालन्यात केल्यामुळे आणखीनच त्रास सहन करावा लागला. या प्रकाराला वैतागलेल्या श्रीमती वाघमारे यांनी थेट महिला आयोगाकडेच मानसिक त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. त्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास देखील ही बाब आणून दिली आहे. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी नेमके कशामुळे त्यांना हजर करून घेतले नाही? याचे अद्यापही उत्तर मिळालेले नाही. कदाचित या पदावरून जालना येथून बदलून गेलेल्या अधिकाऱ्याचे मागील काही कामे बाकी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे श्रीमती वाघमारे यांना हजर करून घेतल्यानंतर त्या “ती” कामे  पूर्ण करतीलच असे नाही, म्हणूनच की काय त्यांना हजर करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती .परंतु आता श्रीमती क्रांती वाघमारे या जिल्हा नियोजन कार्यालयात लेखाधिकारी म्हणून हजर झाल्या आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
–9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version