जालना- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आणि या निवडणुकीची पहिली तयारी म्हणून पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक विभागाअंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत .त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातून दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक जात असून इतर जिल्ह्यातून दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक जालना जिल्ह्यामध्ये येत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या बदल्यांचे आदेश आज बुधवार दिनांक 17 रोजी जारी केले आहेत.
बाहेर जिल्ह्यातून येणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढीलप्रमाणे चंद्रकांत चातुरे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, निलेश इधाटे बीड, योगेश उबाळे बीड, अशोक खरात बीड, योगेश खटकर बीड ,कैलास भारती बीड, अमोल गुरले बीड, शांतीलाल चव्हाण धाराशिव, गणेश सुरवसे छत्रपती संभाजी नगर ,संतोष माने छत्रपती संभाजी नगर. दहा सहायक पोलीस निरीक्षक बदली करून जात असून दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक जालन्यामध्ये येत आहेत कोणत्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोणते पोलीस ठाणे दिले जाणार हे ठरवण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षकांना आहेत. त्यानुसार येणारे अधिकारी रुजू होताच त्यांना संबंधित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या जातील.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172