जालना- राज्य शासनाने सुमारे 17000 पोलीस शिपाई भरती करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने या भरतीची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे शासनाची तयारी सुरू झाली आहे तर दुसरीकडे पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणांनी देखील शारीरिक आणि लेखी परीक्षेची जोरदार तयारी सुरू केली आहे.
कोणतीही परीक्षा असो ती परीक्षा देण्यासाठी कोणाचे न कोणाचे तरी मार्गदर्शन हवेच असते आणि त्यातूनच ध्येय गाठता येते .पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा याविषयी स्वामी विवेकानंद प्रबोधिनीचे संचालक सुधीर हजारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ,” फक्त सुदृढ शरीरच आवश्यक नाही तर त्यासाठी पिळदार शरीर ही एक जमेची बाजू आहे आणि त्यासाठी कसरत महत्त्वाची ठरते .ही कसरत शहरांमध्ये क्वचितच करता येते. कसरती सोबतच लेखी परीक्षेला तोंड देताना अभ्यासही महत्त्वाचा ठरतो हा अभ्यास करण्यासाठी शांत, एकांत असलेले ठिकाण त्यासोबत अभ्यास कशा पद्धतीने करायचा याचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरते. 2015 पासून अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मार्गदर्शन या प्रबोधिनीच्या माध्यमातून केले आहे, आणि म्हणूनच मागच्यावर्षी ९० उमेदवारांची पोलीस म्हणून भरती झाली आहे”.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com