जालना- लांब पल्यांच्या रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा म्हणजेच पीट लाईनचा शुभारंभ आज दिनांक 13 रोजी जालना येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी पहिल्यांदाच प्रेक्षकांसाठी असलेल्या खुर्च्या आणि नेतेमंडळी साठी असलेले व्यासपीठ दोन्हीही रिकामे असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नेत्यांची भाषणे आणि स्तुतीसुमने यांच्या अभावी अवघ्या अर्ध्या तासातच हा कार्यक्रम संपला. दरम्यान आज व्यासपीठावर अजित पवार गटाचे एक नेता सोडला तर इतर कोणत्याही पक्षाचा नेता ,पदाधिकारी दिसला नाही. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारणा केली असता ते म्हणाले” हा शासकीय कार्यक्रम आहे.. त्यानुसार कार्यक्रम पत्रिकेत सर्वांची नावे टाकली आहेत. परंतु येणे न येणे ज्याच्या त्याच्या हातात आहे, आणि आता निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे अशावेळी एकमेकाकडे जाणं जरा अवघडच वाटतं.” खरंतर चार दिवसांपूर्वी जालना शहरांमध्ये 101 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले परंतु त्या पत्रिकेत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, हे वगळून इतर सर्वपक्षीय नेत्यांची नावे होती, मग त्यावेळी तो कार्यक्रम शासकीय नव्हता का? असा प्रश्न इतर पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
 App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172