जालना-लढतांना गोळी लागल्यावर जखमी झालेला सैनिक ज्यावेळी रुग्णालयात येतो आणि त्याच्या डोळ्यातील डॉक्टरांवरील विश्वास हा स्पष्टपणे जाणवतो ,तो म्हणजे “डॉक्टर मला निश्चित बरे करतील आणि पुन्हा देशसेवेसाठी मी सज्ज होईल”. त्याच्या या विश्वासाला सार्थ ठरण्याचा आम्ही प्रयत्न करतो .तो आनंद शब्दात  सांगता येणे कठीण आहे .परंतु देशसेवेच्या आनंदासारखा दुसरा आनंदही नाही-डॉ. गिरीश पार्थ देशमुख.

भारतातील एकमेव असलेल्या सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालयात(AFMC, आर्मी फोर्सेस मेडिकल कॉलेज) दरवर्षी फक्त दीडशे विद्यार्थ्यांचीच निवड केल्या जाते. त्यापैकी 2018 मध्ये महाराष्ट्रामधून केवळ दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यामध्ये जालनाच्या पार्थ गिरीश देशमुख याची निवड झाली होती. आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करून तो सध्या या चिकित्सालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.  पहिली नियुक्ती 2023 मध्ये बंगलोर येथील एअर फोर्सच्या कमांड हॉस्पिटलमध्ये मिळाली होती. त्यानंतर आता गुजरात येथे नियुक्ती केल्या जाणार आहे. घरातील कोणतीही वैद्यकीय किंवा सैन्य दलाची पार्श्वभूमी नसताना देखील सैन्याची सेवा करण्यासाठी गेलेल्या या पार्थला 2018 मध्येच घरच्यांनी सैन्याला सुपूर्द केले होते.

मनामधील धाकधूक आणि भीती दूर सारून त्याने हे ध्येय गाठले, आणि आपण नाही करणार तर कोण करणार? अशा अभिमानाने देखील हा डॉक्टर आज जखमी झालेल्या सैनिकांची सेवा करत आहे. या असामान्य ध्येयाकडे जाण्यासाठी कोणती वाट आहे? कोणता रस्ता जातो? काय आनंद मिळतो ?कसं जीवन बदलतं? त्यासोबत समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो? आणि हे सगळं बदललेलं जग पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं! हे सर्व काही त्याने ध्येय वेड्या तरुणांसाठी सांगितलं आहे. त्यासाठी डॉ. पार्थ देशमुख यांची ही मुलाखत अवश्य पहा.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version