जालना- जालना शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे दुसरे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. रविवार दिनांक 19 रोजी जालना शहरातील महावीर चौकात असलेले एटीएम फोडले होते आणि सुमारे 24 लाख रुपयांची रक्कम चोरट्यानी लांबवली होती. रात्री फोडलेल्या एटीएम मधून सुमारे आठ लाखांची रक्कम पळविली असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.
गॅस कटरच्या साह्याने हे एटीएम कापले होते. त्याच पद्धतीने काल मध्यरात्रीच्या सुमारास जालना- छत्रपती संभाजी नगर महामार्गावर असलेल्या याच बँकेचे बाजूलाच एटीएम आहे. 24 तास रहदारीचा रस्ता असताना देखील चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने हे एटीएम कापून मशीन मधील पैसे लंपास केले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम आठ लाखाच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे.. सुमारे तीन वर्षांपूर्वी याच ठिकाणचे एटीएम चोरट्यांनी फोडण्याच्या भानगडीत न पडता पूर्ण मशीनच पळवली होती. त्या मशीनचा तपास ,महावीर चौकातील फोडलेल्या एटीएम चा तपास बाकी असताना आज पुन्हा हे एटीएम फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. दरम्यान महावीर चौक आणि जालना- छत्रपती संभाजी नगर महामार्ग या दोन्ही ठिकाणचे एटीएम भर वस्तीत असताना देखील चोरट्यांनी हा डल्ला मारल्यामुळेपोलिसांची गस्त कुठे गेली ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172