जालना- पोटच्या सात वर्षाच्या बालकाला अमानुष मारहाण करून त्याला चटके देणाऱ्या पित्याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहरातील मंगळ बाजार भागामध्ये सुरेश सगट हा व्यक्ती राहतो घरच्या काही अडचणीमुळे त्याने त्याच्या सात वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण करून कडीपेटीच्या जळत्या काडीने चटके दिले आहेत. मारहाण केल्यामुळे सर्व बालकाच्या सर्वअंगावर वळे उमटली आहे तर चटके दिल्यामुळे देखील हाताला फोड आले आहेत ,पायाला देखील चटके दिल्याच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत .अशा परिस्थितीमध्ये बालकाची आजी शाहूबाई कचरू गव्हारे वय 65 राहणार, हादगाव खुर्द तालुका जिल्हा परभणी हिने शनिवार दिनांक आठ रोजी सामान्य रुग्णालयात भरती केले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. चाइल्ड हेल्पलाइन च्या कार्यकर्त्यांनी ही माहिती बालकल्याण समितीला दिल्यानंतर बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधून सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 324 अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015) अन्वये हा गुन्हा दाखल केला.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172