जालना- क्रिप्टो करन्सी, गोल्ड डिजिटल कॅश कॉइन, ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन ,जीडीसी या नावाने वेगवेगळ्या विभागांमध्ये ही फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक केलेल्या आरोपींनी जमा झालेल्या पैशातून विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. या मालमत्ता देखील जालन्याच्या आर्थिक गुन्हा शाखेने जप्त केल्या आहेत. कोट्यावधी रुपयांच्या या मालमत्ता आहेत .कोणाची कुठे आहे मालमत्ता? आणि त्याची किंमत काय आहे हे आता पाहूयात. या मालमत्तेची किंमत ही सरकारच्या नियमानुसार आहे परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी  जास्त ही  किंमत असते.

1) इरफान मोईद्दीन सय्यद राहणार गहुजे तालुका मावळ जिल्हा पुणे, यांनी खरेदीखत क्रमांक 449 दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी रीना कामत व इतरांकडून दुय्यम निबंधक मावळ पुणे यांच्या अधिपत्याखालील इन्स्टेगल को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, लोढा बेलमोंढा टॉवर 15 मधील पाचवा मजला फ्लॅट क्रमांक 501 ,फोर बीएचके दोन हजार स्क्वेअर फुट ज्याची सरकारी किंमत दोन कोटी 25 लाख रुपये आहे, दुसरे खरेदी खत क्रमांक 17,650 दिनांक 11 नोव्हेंबर 2021 सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग दोन हवेली क्रमांक 15 पुणे येथून नैनेश मारोली भाऊ नंदू बिल्डिंग नंबर 48 गंगा स्टेट लाईट पुणे ,यांच्याकडून स्वतःच्या आणि दिवाण रमेश उत्तेकर यांच्या नावावर मोजे बाणेर तालुका हवेली येथे सातव्या मजल्यावर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याची किंमत 62 लाख 40 हजार रुपये आहे अशी एकूण दोन कोटी 87 लाख रुपयांची मालमत्ता इरफान मोईद्दीन यांनी खरेदी केलीआहे.2) अमोल वसंतराव मेहतर, यांनी खरेदीखत क्रमांक 16 968 दिनांक 10 जुलै 2022 रोजी मौजे नाथबडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे 1150 चौरस मीटरची मिळकत खरेदी केली आहे जिची किंमत एक कोटी सत्तर लाख रुपये आहे 3) व्यंकटेश दशरथ भोई, यांनी खरेदी खत क्रमांक 1759 दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी राहुल कन्स्ट्रक्शन को प्रभात रोड येरवडा पुणे यांच्याकडून व्यंकटेश भोई यांची पत्नी प्रीती व्यंकटेश भोई ,यांच्या नावावर तीन भूखंड खरेदी केले आहेत. ज्याची किंमत दोन कोटी 25 लाख रुपये आहे. दुसऱ्या एका ठिकाणी खरेदीखत क्रमांक 924 दिनांक 25 2 2022 रोजी प्रीती व्यंकटेश भोई यांच्या नावावर मौजे यड्राव तालुका शिरोळ,  येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात  बिगर शेती खुली जागा गट नंबर 225 पैकी प्लॉट नंबर 55 मधील 238 चौरस मीटर क्षेत्र हे अपर्णा आनंद मराठे यांच्याकडून खरेदी केले आहे .ज्याची किंमत 17 लाख 50 हजार आहे अशा दोन्ही मिळकती म्हणून मिळून दोन कोटी 42 लाखांची खरेदी केलेली आहे.4) रमेश बाबुराव उत्तेकर यांनी खरेदीखत क्रमांक 11 196 दिनांक 22 जून 2022  रोजी त्यांची पत्नी आणि मुलाच्या नावावर पुणे मनपा हद्दीतील बाणेर येथील सर्वे नंबर 221, 222, 223, मधील विविध भूखंड स्पार्क या प्रोजेक्टमधील बिल्डिंग नंबर बी मधील पंधराव्या मजल्यावर फ्लॅट नंबर 1502 व इतर मालमत्ता अशी एकूण पाच कोटी 97 लाख रुपयांची मिळकत खरेदी केली आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version