जालना- समाजातील समस्यांसंदर्भात काम करण्याची आमची इच्छा असूनही कायद्यामुळे हात बांधलेले आहेत काही मर्यादा आहेत परंतु सध्या समाजातील सर्वच थरामध्ये मुलामुलींवर लैंगिक अत्याचार वाढत आहे ही एक चिंतेची बाब आहे. चिंता जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी व्यक्त केली आहे. इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन यांचा संकल्पित पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला, यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या क्लबच्या  मावळत्या अध्यक्ष शिखा गोयल यांच्याकडून नवनियुक्त अध्यक्ष विधीज्ञ अश्विनी धनावत यांनी पदभार स्वीकारला. पुढे बोलताना न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते म्हणाल्या न्यायदानाच्या खुर्चीत बसल्यामुळे कायद्याने बरीच बंधने असतात त्यामुळे इच्छा असूनही काही कामे करता येत नाहीत परंतु  इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझन सारख्या संस्थांनी पुढे येऊन आम्हाला मदत केली तर यामधून काही मार्ग काढता येऊ शकतो असेही त्या म्हणाल्या.

 

बाल लैंगिक अत्याचार हा फक्त मुलींवरच होतो असे नव्हे तर तेवढ्याच प्रमाणात मुलांमध्ये देखील या अत्याचाराचे प्रमाण आहे असे सांगत असतानाच त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली त्या म्हणाल्या ,” मुलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत या अत्याचारा संदर्भात जेवढे निकाल देत आहोत त्यामध्ये हे प्रमाण वाढतच आहे .का वाढत आहे?” याबद्दल सांगताना श्रीमती वर्षा मोहिते म्हणाल्या की” आपला असा गैरसमज आहे की छळ फक्त मागासलेल्या समाजातील लोकांमध्येच होतो परंतु तसे नाही ,उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजामध्ये देखील याचे प्रमाण आहे .परंतु ते बदनामीच्या भीतीने समोर येत नाही .दुसरे म्हणजे मुलींमध्ये लैंगिक अत्याचाराचे प्रमाण जास्त असल्याचाही गैरसमज आहे परंतु तो देखील खोटा आहे .मुलींच्या बरोबरच मुलांवर देखील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण आहे. परंतु आपण त्याकडे कमी लक्ष देतो आणि तिसरं म्हणजे या बालकांवर लैंगिक अत्याचार हे समाजापेक्षा घरचे आणि नातेवाईकांकडूनच जास्त होतात. कारण सध्य परिस्थितीमध्ये आई-वडील नोकरीच्या निमित्ताने, उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर जातात आणि मुलांना शेजारी किंवा नातेवाईकांकडे सोडतात. अशावेळी हे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. यासाठी  समाजामध्ये जनजागृती व्हायला पाहिजे आणि ती इनरव्हील क्लब ऑफ होरायझोन सारख्या संस्थांच्या माध्यमातून आमची करण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाल्या .सोबतच इतर अनेक उपक्रमही न्यायालयामार्फत चालवले जातात. त्यासाठी देखील अशा संस्थांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये बालकामगारांचाही प्रश्न बिकट असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला िल्हा व विधी सेवा प्राधिकार्‍यांच्या सचिव प्रणिता भारसाकडे -वाघ यांचीही उपस्थिती होती. नवीन कार्यकारणी मध्ये इनरव्हील क्लब ऑफ जालना  होरायझनच्या अध्यक्षपदी विधीज्ञ अश्विनी धन्नावत, उपाध्यक्ष उर्वशी खंडेलवाल ,सचिव विधीज्ञ पिंकी लड्डा, सहसचिव प्रीती बडजाते ,खजिनदार पूजा राठी, संपादक बनप्रीत झुनझुनवाला आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये पुनम खंडेलवाल आराधना छाजेड डॉ. सुजाता नानावटी यांचा समावेश आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version