जालना- जालना जिल्हा महसूल आस्थापनेवरील तलाठी पदभरती – २०२३ अंतर्गत आज दिनांक ३०जुलै रोजी निवडयादीमधील कागदपत्र पडताळणीपूर्ण झालेल्या एकूण ५२ उमेदवारांना तलाठी नियुक्तीपत्र अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवर व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या हस्ते देण्यात आले.
शासनामार्फत आगामी “महसूल दिन’ व “महसूल सप्ताह’ आयोजनाचे औचित्य साधुन तलाठी उमेदवार यांना प्रथम प्राधान्याने नियुक्तीपत्र देऊन त्यांना महसूल विभागामध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतीमान होण्यास मदत होईल.
जालना जिल्ह्यात झालेल्या एकूण ११६ नवीन तलाठी पद भरतीच्या अनुषंगाने त्यापैकी ५२ लोकांना आज व यापूर्वी १६ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. शासनाच्या महत्त्वकांशी योजना राबवताना विविध योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राकरीता सर्वप्रथम नागरिकांना तलाठी यांच्याकडे जावे लागते. सातबारा, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे जमा करताना जिल्ह्यामध्ये आता नवीन तलाठी भरती केल्यामुळे लोकांचे कामे अधिक सुलभ व जलद गतीने होतील. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुक कामकाजासाठी सुद्धा कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172