जालना- मागील काही वर्षांच्या कालखंडानंतर जालना शहरांमध्ये पुन्हा एकदा गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.  यातूनच नवनवीन संकल्पना घेऊन गणेश भक्तांनी श्रींच्या मूर्तींची उभारणी केलेली आहे. या संकल्पना शब्दात मांडणे कठीण आहे त्यासाठी या मूर्ती पाहिलाच पाहिजेत.

या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिव्य आणि गगनचुंबी अशा उंचच्या उंच गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. शनिवारी दुपारपासूनच शहरात, गल्लीबोळांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर गणरायाच्या मिरवणुकीचे स्वागत करणाऱ्या ढोल ताशांचे आवाज घुमू लागले .रात्री उशिरापर्यंत या मिरवणुकीत गणेश भक्त सहभागी झाले होते. मुख्य रस्त्यावरून जाताना उंच असलेल्या गणेश मूर्तींना विजेच्या तारांचा स्पर्श होऊ नये म्हणून गणेश भक्तांना तारेवरची कसरत करावी लागली. आज पहिलाच दिवस होता. दोन दिवसावर महालक्ष्मी पूजन हा गौरीचा सण आहे. तो संपल्यानंतर विविध प्रकारचे देखावे सादर केले जाणार आहेत .त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव भव्य दिव्य आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे असाल यात शंका नाही.

आजच्या या व्हिडिओमध्ये गणेश भक्तांना मूर्तीचा अंदाज यावा आणि ते पाहण्याची उत्सुकता वाढावी या हेतूने काही क्षणचित्र टिपले आहेत. उद्यापासून भाविकांसाठी गणेशाच्या विशेष बातमी देण्याचे प्रयत्न असणार आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version