जालना- कांही गोष्टी अशा असतात की ज्या घडतात त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं पण त्यामधून देखील कांही  ना कांही तरी चांगलंच होतं .म्हणूनच आपण अनेक वेळा म्हणून जातो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं .

niramy

अशीच कांही परिस्थिती कोविड-19 मुळे आपली झाली होती आणि 24 तास घरात बसणाऱ्या माणसांना वेळ जात नव्हता .त्यामुळे दूरचित्रवाणीवर रामायण आणि महाभारत या अजरामर मालिका सुरू झाल्या होत्या. याचा फायदा असा झाला की, तरुण पिढीला आणि लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख झाली आणि या मालिकेचे आपल्या ग्रंथांचे महत्त्व कळाले. त्याचाच फायदा घेत हे पुन्हा साकारण्यासाठी जालना शहरातील बालाजी गल्लीत असलेल्या डॉ. सलोनी संजय पंच यांनी गणपती समोर या संपूर्ण रामायणाचा देखावा साकारलेला आहे.  तो सर्वांसाठी पाहायलाही उपलब्ध आहे. पुढील पिढीला यापासून प्रेरणा मिळावी असं त्यांचं मत आहे .त्यांच्या या देखाव्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी  डॉ.पंच यांचा नंबर आहे-8080155632. हा देखावा आपणही जाऊन पाहू शकता.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version