जालना -ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दरम्यान जालन्यामध्ये सुमारे 4 हजार100 गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे आणि या गुंतवणूकदारांची एकूण रक्कम 218 कोटींच्या जवळपास जात आहे .या गुन्ह्याच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्व ज्ञानराधाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुठे आणि त्यांचा भाचा संचालक आशिष पाटोदेकर या दोघांना दोन वेळा जालन्यात आणले होते.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोट्यवधींची वाहनेही जप्त केली आहेत. आता दिनांक पाच रोजी ज्ञानराधाचे उपाध्यक्ष यशवंत वसंतराव कुलकर्णी वय 54 वर्ष ,आणि त्यांचा मुलगा संचालक वैभव यशवंतराव कुलकर्णी वय 25 वर्ष या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड न्यायालयाच्या परवानगीने जालना येथे चौकशीसाठी आणले आहे. दरम्यान शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवार दिनांक आठ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस अंमलदार गोकुळसिंग कायटे, अंबादास साबळे समाधान तेलंग्रे, फुलसिंग घुसिंगे, ज्ञानेश्वर मस्के ,रवी गायकवाड, यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे कर्मचारी या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172