पैठण- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या पैठण येथे गुरु शिष्याच्या परंपरेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खो खो चा प्रशिक्षक तथा राष्ट्रीय खेळाडू याने आपल्याच विद्यार्थिनीवर छत्रपती संभाजीनगर येथे एका हॉटेलवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

पैठण तालुक्यातील बालानगर येथे पीडित विद्यार्थिनी वय वर्ष तेरा ,ज्या शाळेत शिक्षण घेते त्याच शाळेत विद्यार्थिनीच्या घराजवळच शिवाजी जगन्नाथ गोरडे हा शिक्षक राहतो. विद्यार्थिनीच्या शाळेतच तो खो-खो चा प्रशिक्षक म्हणूनही काम करतो आणि स्वतः देखील एक राष्ट्रीय खेळाडू आहे. दरम्यान या विद्यार्थिनीची खो-खोच्या खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. तिला मुंबईला  पाठवण्यासाठी तिच्या घरच्यांनी शिवाजी जगन्नाथ गोरडे यांच्यावर विश्वास ठेवला आणि मुंबईकडे पाठवले. दिनांक 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी नगर येथून मुंबईकडे रेल्वे आहे असे सांगून शिवाजी गोरडे यांनी या विद्यार्थिनीला दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर येथे बोलवले आणि रेल्वेला वेळ आहे म्हणून रेल्वे स्थानकात जवळच असलेल्या हॉटेल पंजाब मध्ये दोघेही थांबले .एका खोलीत थांबल्यानंतर या विद्यार्थिनी सोबत शिक्षकाने लैंगिक चाळे सुरू केले आणि विद्यार्थिनीच्या मनाविरुद्ध, तिचा प्रतिकार झुगारून त्याने कुकर्म केले. एवढ्या वरच तो थांबला नाही तर स्पर्धेवरून परत आल्यानंतर पुन्हा या विद्यार्थिनीच्या शाळेत जाऊन तू मला आवडतेस आणि शारीरिक संबंध ठेवायचे आहेत असे म्हणून पुन्हा विद्यार्थिनींना त्रास देऊ लागला. जर संमती नाही दिलीस तर हॉटेलमध्ये झालेला सर्व प्रकार गावभर सांगेल अशी धमकीही दिली. या सर्व प्रकाराला घाबरलेल्या विद्यार्थिनीने आपबीती आपल्या आईला सांगितली आणि या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये मंगळवार दिनांक 15 रोजी खो-खो चा शिक्षक शिवाजी गोरडे, हॉटेल पंजाब ची मालकीण आणि हॉटेलचा व्यवस्थापक सादिक मिर्झा बेग या तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा 2012 म्हणजेच पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी या करीत आहेत.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version