जालना- दिवसेंदिवस जुने संसर्गजन्य आजार कमी होत आहेत परंतु या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन दरवर्षीच विविध योजना अमलात आणते. त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यामध्ये दिनांक 16 ते 20 डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. शासनाने अडीचशे कुष्ठरोगी शोधण्याचं उद्दिष्ट जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला आणि यासाठी वेगळ्या असलेल्या कुष्ठरोग विभागाला दिलेलं आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या या कुष्ठरोगाचे अडीचशे रुग्ण शोधण्याचा आव्हान जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा समोर आहे. या रोगाची लक्षणे, प्रसार आणि उपचार या विषयी माहिती देत आहेत जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172