जालना- जन्मताच दिव्यांग असलेल्या जालना येथील आदित्य आसाराम घुले या सतरा वर्षाच्या दिव्यांग विद्यार्थ्याने नोव्हेंबर 2024 मध्ये किर्गिस्थान येथे झालेल्या एशियन चेस Chess(बुद्धीबळ) चॅम्पियन्स स्पर्धेत ब्रांझ पदक मिळवून आपल्या दिव्यांगावर “बुद्धिबळाने” मात केली आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलंही दिव्यांगपण यशाच्या आड येत नाही हेच त्याने दाखवून दिलं आहे. या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या देशातून 80 स्पर्धक सहभागी झाले होते .आदित्यने ब्रांझ पदक मिळवत दिव्यांगावर मात केली आणि देशासोबतच आई-वडिलांची देखील मान उंचावली आहे.
आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल Edtv News ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो” 2017 मध्ये मी शाळेत असतानाच मला घरच्यांनी मोबाईल दिला. खरंतर मला मोबाईल पासून दूर राहायचं होतं त्यामुळे मी बुद्धिबळाकडे वळालो. 64 चौकोनातील प्यादे, घोडे, हत्ती, उंट, यामध्ये मी रमलो परंतु योग्य मार्गदर्शक मिळत नव्हता म्हणून मी मोबाईल मध्येच या मार्गदर्शकांना शोधत होतो आणि त्यामध्ये मला मार्गदर्शकाचे नाव सापडले. तिथून पुढे माझा बुद्धिबळाचा प्रवास सुरू झाला. मला मेडल मिळावं हे माझं नाही तर माझ्या प्रशिक्षकांचं ध्येय होतं .मी फक्त त्या वाटेने चालत गेलो. त्यामुळे मोबाईल विषयी आता माझे मत बदलले आहे .मोबाईलचा चुकीचा वापर न करता त्याचा योग्य वापर करावा त्यामुळे निश्चितच फायदा होतो. एखाद्या व्यक्तीमध्ये भाषेचे ज्ञान नसेल, त्याच्यात काही गुणवत्ता कमी असेल, तो दिव्यांग असेल तर समाज त्याला बाजूला सरकवतो परंतु जिद्द आणि चिकाटी जर असेल तर याच समाजाला आपल्याकडे आकर्षित देखील करता येतं आणि ते मला अनुभवातून समजलं आहे .भविष्यामध्ये मला एमबीए किंवा वकिली करायची आहे .त्या दिशेने माझा प्रवास सुरू आहे. परंतु माझ्या मित्रांना एकच सांगेन की ,नवीन गोष्टींसाठी प्रयत्न करा, एकाच ध्येयाच्या मागे एकाच गोष्टीच्या मागे पळू नका, लवकर पैसे कमवण्याच्या मागे जाऊ नका. झटपट पैसा जसा येतो तसाच तो झटपट जातो त्यामुळे योग्य पद्धतीने पैसा कमावणे हेच योग्य राहील.”
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता. -दिलीप पोहनेरकर-9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com