जालना- कोविडच्या काळात मृतदेहांचे पडलेले ढीग नातेवाईकांनी मृतदेहाकडे फिरवलेली पाठ आणि मृतदेहांची होणारी अवहेलना, या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी तत्कालीन सरकारने आणि तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तातडीची बाब म्हणून आवश्यक असणाऱ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी” विद्युत दाहिनी” बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. अनेक ठिकाणी या विद्युत दाहिनी बसवल्याही गेल्या आहेत. तसेच विद्युत दाहिनी जालना शहरात असलेल्या रामतीर्थ स्मशानभूमीत देखील बसवली गेली परंतु, ही विद्युत दाहिनी गेल्या चार वर्षांपासून कार्यान्वितच नसल्यामुळे सर्व यंत्रणा गंजली आहे आणि शासनाच्या एक कोटी रुपयांची राख झाली आहे.

खरे तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहांवर  जालना शहरातील गांधीनगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी केला जायचे. त्यामुळे ही विद्युत दाहिनी तिथे उभी करावी अशी अनेक नागरिकांची मागणी होती. परंतु प्रशासनापुढे कोणाचे चालले नाही आणि जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत ही विद्युत दहिणी उभारण्यात आली.  या विद्युत दाहिनीच्या साहित्यावर कसल्याच प्रकारचे आवरण नसल्यामुळे ऊन, वारा, पावसामध्ये ही सर्व यंत्रणा गंजली आहे. जालन्यातील बहुतांश नागरिकांना इथे विद्युत दाहिनी आहे हेच माहीत नाही. ज्यांना माहित आहे त्यांची मने अजून या विद्युत दाहिनीचा वापर करण्यासाठी धजत नाहीत. कारण पारंपारिक अंत्यविधी हा भावनिकतेशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे काही दिवस तरी या विषयाची जनजागृती करणे आवश्यक आहे. आणि महानगरपालिकेने ती केली पाहिजे. तसे न झाल्यामुळेच अद्याप पर्यंत या विद्युत दाहीनेकडे जनतेने पाठ फिरवली आहे.

विद्युत दाहिनी चा वापर केल्यामुळे कर्मकांड करण्यासाठी आपल्याला मृतदेहाची रक्षा आणि अस्थी आवश्यक असतात त्या सर्व मिळतात .तसेच गोवरी आणि लाकडाची बचत होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि कधी -कधी एका मृतदेहाच्या दहनासाठी लागणारे दोन ते तीन तास या विद्युत दाहिनीत मृतदेहांवर एक तासात प्रक्रिया होते. अन्य कोणत्याही शासकीय कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्या कामाचे उद्घाटनही केले जाते परंतु गेल्या तीन वर्षांपासून रामतीर्थ स्मशानभूमीत बसवलेली ही विद्युत दाहिनी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत गंजून गेले आहे. आणखी सविस्तर माहिती पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या  www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version