जालना- मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आम्ही दाखवून गुंतवणूकदारांची रक्कम परत न करणाऱ्या राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी परळी, या संस्थेविरोधात जालना येथे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, राहणार गुरुकृपा नगर परळी यांना काल दिनांक 25 रोजी अटक केली होती आणि आज न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करताना न्यायालयात सांगितले की अशाच प्रकारचे आणि याच कलमांचे गुन्हे अनेक ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामध्ये जालना, बीड,परभणी, धाराशिव, पंढरपूर या ठिकाणचा समावेश आहे आणि त्या त्या ठिकाणच्या पोलिसांनी बियाणींना ताब्यात घेऊन सर्व चौकशी केली आहे .त्यामुळे आता चौकशी करण्यासारखे काही राहिले नाही .त्यामुळे बियाणी यांना पोलीस कोठडी देऊ नये. परंतु सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अशोक मते यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती न्यायालयाने ती चार दिवसांची दिली आहे म्हणजेच आता 29 तारखेला आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस चंदुलाल बियाणी यांना पुन्हा न्यायालयात हजर करतील.
राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह चे हे आहे संचालक मंडळ चंदुलाल बियाणी अध्यक्ष, बालचंद लोढा उपाध्यक्ष, बद्रीनारायण बाहेती सचिव, प्रल्हाद अग्रवाल सहसचिव, विजयप्रकाश लड्डा कोषाध्यक्ष ,अशोक जाजू संचालक, सचिन सारडा संचालक, नामदेव रोडे संचालक, जगदीश बियाणी कार्यकारी संचालक , व्यंकटेश कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर दोन माहिती परिवाराच्या महिला संचालिका आहेत.
अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment & Share)* प्रतिक्रिया द्या.बातमी वाचण्यासाठी www.edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या-9422219172