जालना- जालना जिल्हा परिषदेची नाक कापणारी आणि शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगणारी घटना दिनांक 3 मार्च 2025 रोजी परतुर तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात घडली होती. येथील गट समन्वयक तथा सहशिक्षक चंद्रकांत पौळ यांनी शिक्षकांच्या पगारातून कपात केलेली आयकराची एक कोटी 34 लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली होती. आर्थिक वर्ष संपल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट समन्वयक आणि गट शिक्षणाधिकारी या दोघांनाही निलंबित केले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले. परंतु शिक्षण विभागाला अजून पर्यंत त्या दोघांवर गुन्हे दाखल करायला वेळ मिळालेला नाही.

अशा प्रकरणाला खतपाणी कोण घालतं? छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) यांना पत्र दिले . या पत्रामध्ये जिल्ह्यामध्ये नियमबाह्यरित्या करण्यात आलेल्या वर्ग तीन वर्ग चार व शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था प्रतिनियुक्ती असे सर्व आदेश रद्द करून त्या कर्मचाऱ्यांना मूळ पदस्थापनेवर पाठवावे, तसेचअसे आदेश निर्गमित करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तसा अहवाल पंधरा दिवसाच्या आत पाठवण्याचे सुचित केले होते.( प्राथमिक शिक्षण विभागातून प्रस्ताव गेल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 5 जुलै रोजी हे आदेश काढले होते). या पत्रावर आठ महिने होऊन गेले परंतु पुढे काही कारवाई झाली नाही. दरम्यानच्या काळात हे 10 शिक्षक बदली पोर्टल, पवित्र पोर्टल, इतर संगणकीय कामे करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना(CEO) यांनी दिनांक पाच जुलै 2024 रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठवले होते . या सर्व दहा गट समन्वयकांची पुन्हा दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे विभागीय आयुक्तांनी काढलेल्या आदेशाच्या दिवशीच ते पत्र मिळण्यापूर्वीच श्रीमती मीना यांनी शिक्षणाधिकाऱ्याला बाजूला सरकून थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावाने आदेश काढले आणि दिनांक पाच जुलै 2024 रोजीकेलेल्या  प्रतिनियुक्त्या रद्द करून टाकल्या. दरम्यानच्या काळात ही सर्व संगणकीय कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर तीन आणि प्रत्येक गट गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांच्याकडून कामही करून घेतले. त्यानंतर आता प्रश्न असा आहे की , या 10 शिक्षकांच्या प्रतिनियुक्त केल्या कोणी? त्यांना आदेश दिले कोणी? आणि आज ते काम करतात ?कसे करतात? हा सर्व खेळ तोंडी शब्दावर चालू होता. ज्यामुळे परतुर येथे घडलेल्या या अपहरला खतपाणी घातल्या गेलं .त्या दहा पैकीच एक म्हणजे परतुर येथील गट समन्वयक चंद्रकांत पौळ हे आहेत. मुळात जिथून हे प्रकरण सुरू झालं त्या विभागीय आयुक्तांच्या पत्रावर अजून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काहीच निर्णय घेतलेला नसल्यामुळे किंबहुना त्यांच्यापर्यंत हे पत्रच गेलेले नसल्यामुळे काल दिनांक 15 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी 24 तासात खुलासा करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळी यांना बजावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version