जालना- परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आयकर रकमेमध्ये अपहार झाला आहे. परतुर येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार विस्तार अधिकारी संतोष साबळे यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु नुकत्याच झालेल्या एक कोटी 34 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी संतोष साबळे यांना जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. या अपहारावरून जालना जिल्हा परिषदेचा प्राथमिक विभाग सर्वत्र सध्या चांगला चर्चेत आला आहे आणि परतुरचे गटविकास अधिकारी पदही वादग्रस्त ठरले आहे. त्यामुळे या पदावर आता कोण कोणाची नियुक्ती होणार ?हा गेल्या चार दिवसांपासून चर्चेचा विषय सुरू होता .परंतु आता गटशिक्षणाधिकारी पदाच्या रिक्त झालेल्या जागेवर नेर विभागाच्या विस्तार अधिकारी श्रीमती प्रेरणा लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच याच सोबत शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्याकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी विवेकानंद कुलकर्णी यांना 30 आठवड्यांसाठी मंठा गटशिक्षणाधिकारी पदाचा स्वतंत्र पदभार देण्यात आला होता .त्यानुसार त्यांनी दिनांक 3 मार्चला मंठा येथे हजर होऊन पदभारही घेतला होता .परंतु त्यांना परविक्षाधीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आल्यामुळे दिनांक 2 एप्रिल रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा मंठा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदावर विपुल भागवत यांची नियुक्ती जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी केली आहे.
बातम्यांसाठी संपर्क-दिलीप पोहनेरकर- ,9422219172