जालना- जालना जिल्हा परिषदेच्या परतुर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आयकर भरण्यामध्ये अपहर झाला होता. या प्रकरणी अपहार करणाऱ्या त्या दोघांवर परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परतुर गटशिक्षणाधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या पगारातून मागील वर्षी टप्प्याटप्प्याने आयकर कपात केला होता. संबंधित आयकर त्या शिक्षकांच्या खात्यावर न भरता गटशिक्षणाधिकाऱ्याची आयडी वापरून शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ यांनी एक कोटी 34 लाख रुपयांची रक्कम हडप केली होती. आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी चंद्रकांत पौळ आणि गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांना जबाबदार धरून दोघांनाही निलंबित केले होते आणि अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कैलास दात खेळ दिले होते. त्यानंतर चंद्रकांत पौळ यांनी ही सर्व रक्कम पुन्हा शासन दरबारी जमा केली. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. गुन्हा दाखल करू नये म्हणून शिक्षण विभागावर राजकीय दबाव येत होता,तसेच आता रक्कम भरली आहे गुन्हा कशाला दाखल करायचा? अशा प्रकारची भाषा सुरू झाली. असाच प्रकार यापूर्वी देखील परतुर तालुक्यात शिक्षण विभाग आताच घडला होता. त्यामुळे अशा प्रकाराला खतपाणी घातल्या जात आहे आणि “म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावत आहे” असे म्हणत सर्वच स्तरातून शिक्षण विभागावर दबाव आणला गेला. त्यामुळे शेवटी काल दिनांक 22 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी परतुर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे आणि शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 316 आणि 318 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .कलम 318 मध्ये तीन वर्षाचा कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे.

सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version