जालना- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर( ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस(,AIIMS) च्या अध्यक्षपदी जालन्याचे भूमिपुत्र डॉ. अनंत भास्करराव पंढरे (ABP)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने जालन्यातील सम्यक परिवाराच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. पंढरे यांचा सत्कारही त्याच ताकतीच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ते होते डॉ. विजय चौथाईवाले. जे सदस्य – कार्यकारी समिती विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार व प्रभारी, महाराष्ट्र व्यवहार विभाग दिल्ली .त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही ते विश्वासू म्हणून ओळखले जातात. यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक तथा डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे संचालक अनिल भालेराव यांच्यासह प्रमुख उपस्थितीमध्ये रोटरीचे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू ,गणेश तपोधाम जालनाचे अध्यक्ष सुदेश सकलेचा, सम्यक परिवाराचे अतुल वझरकर आणि सौ. सीमा अनंत पंढरे यांची उपस्थिती होती.(सविस्तर कार्यक्रम पहा खलील व्हिडीओ मध्ये)
सत्काराला उत्तर देताना डॉ. पंढरे यांनी त्यांची नियुक्ती हा डॉ. हेडगेवार रुग्णालय छत्रपती संभाजीनगरचा गौरव आहे, तसेच माणूस घडतो कसा? याचे प्रात्यक्षिक गेल्या 30 वर्षांमध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये झाले आहे. असे गौरवोद्गार काढले आणि मागील 35 वर्षाच्या प्रवासातील अनेक चढउतारांना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर त्यांची पत्नी डॉ .सीमा पंढरे यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान डॉ. अनंत पंढरे यांच्या भगिनी सुनीता पेंढारकर यांनी पारिवारिक आठवणींना उजाळा दिला. यावेळी मान्यवरांनी डॉ. पंढरे यांच्या कर्तुत्वाला उजाळा दिला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि या सत्काराची भूमिका सम्यक परिवाराचे डॉ. पद्माकर सबनीस यांनी विशद केली. सन्मान पत्राचे वाचन डॉ. धनश्री सबनीस यांनी केले. सूत्रसंचालन वैभव जोशी यांनी केले तर आभार अतुल वझरकर यांनी मानले .सम्यक परिवाराचे विजय देशमुख यांचीही यावेळी उपस्थिती होती . यावेळी आमदारांसह उद्योजक प्रतिष्ठित डॉक्टर मंडळी तसेच डॉ. अनंत पंढरे यांच्या जुन्या मित्रांनी सत्कारासाठी गर्दी केली होती.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172