जालना- ऑपरेशन सिंदूर मधील भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज जालन्यामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेच्या वेळी माजी सैनिकांचाही सत्कार करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्रातील 2017 नंतर सेवानिवृत्त झालेल्या सर्वच सैनिकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु नंतर बोलावणेच आले नाही याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया सेवानिवृत्त सैनिक भानुदास एकनाथ शिरसाट यांनी दिली आहे.
जालना शहरातील हुतात्मा जनार्दन मामा चौकापासून ते बडी सडक येथील श्रीराम मंदिरापर्यंत आज ही तिरंगा यात्रा काढण्यात आली .या यात्रेमध्ये सर्व राजकीय पक्षांची मंडळी ,सर्व समाजातील लोकप्रतिनिधी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकप्रतिनिधीमधे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालनाचे आमदार अर्जुनराव खोतकर, भोकरदन चे आमदार संतोष दानवे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे ,भारतीय जनता पक्षाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे, आमदार बबनराव लोणीकर आदींची यावेळी उपस्थिती होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांनी देखील हजेरी लावली .
आज झालेल्या सत्कारामध्ये भानुदास एकनाथ शिरसाट ,प्रकाश दराडे ,राधाकिसन अवताडे, रवींद्र अकोलकर,बाजीराव मुळक, दामोदर दायमा, भाऊसाहेब गवारे, राजू तुकाराम जयवाळ, सुनील नरवडे ,सचिन शिंदे, बाबासाहेब दिखुळे, सुरेश जाधव ,काशिनाथ पंडित ,ज्ञानेश्वर कायंदे ,प्रकाश वाघमारे, रामकिसन शिखरे, संतोष लकडे, बालकिशन आण्णासाहेब चंदर ,दिनकर थोटे, परमेश्वर जमधाने, सोनाजी गिराम ,डी. एस .नवघरे आदींचा समावेश होता.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा. दिलीप पोहनेरकर-9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com