जालना- आर्थिक सुबत्ता असलेल्या जालन्याला पर्यावरण सुबत्तेतही पुढे आणा! असे झाले तरच शहरांचा खरा, शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारा विकास होईल. असे मत महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागाच्या संचालिका श्रीमती प्रतिभा भदाणे यांनी व्यक्त केलं.
क्रेडाई(confederation of real estate developers association of India)च्या वतीने नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रविवार दिनांक 18 रोजी उत्साहात पार पडला .त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर क्रेडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील कोतवाल, सहसचिव गंगाप्रसाद तोष्णीवाल ,यांच्यासह नवनियुक्त अध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव चेतन मराठे, कोषाध्यक्ष सिद्धनाथ शर्मा यांची उपस्थिती होती .यावेळी क्रीडायचे मावळते अध्यक्ष अभय कुलकर्णी यांच्याकडून नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
पुढे बोलताना श्रीमती भदाणे म्हणाल्या, ” जालना जसा सोने का पालना, आहे तसंच पुढील पिढीसाठी क्रेडाईच्या माध्यमातून जल पुनर्भरण, जल व्यवस्थापन, वृक्षारोपण, सौर ऊर्जा प्रकल्प, तसेच हरितक्रांतीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून जालन्याच्या आर्थिक सुबत्तेप्रमाणेच पर्यावरण राखण्यासाठी देखील पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
क्रीडायच्या 2025 ते 27 या दोन वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष अविनाश भोसले ,सचिव चेतन मराठे, सहसचिव विष्णू पाटेकर ,यांच्यासह रितेश मंत्री, अंशुल अबड, रवींद्र हुसे, शरद बारगजे, दीपक अंभोरे, शेखर जयस्वाल ,केदार जाधव, या कार्यकारणीच्या समितीमध्ये सल्लागार म्हणून बनारसीदास जिंदल, शरद जयस्वाल, संजय मुथा, शिवरतन मुंदडा, अशोक कोटेच्या, वामनराव राऊत ,सुनील भावसार, यांची तसेच तरुण उद्योजकांच्या समन्वयासाठी वैभव बंब यांची निवड करण्यात आली आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा करवा यांनी केले.
सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
दिलीप पोहनेरकर-9422219172