जालना – जालना जिल्ह्यात 18 ऑगस्ट, 2021 रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले असून नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना यांनी एका पत्रकाद्वारे दिल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalna