जालना- सर्वच विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे. कोणाची विनंतीवरून, कोणाची मुदत संपल्यामुळे, तर कोणाची तक्रारीमुळे बदली होत आहे .या बदल्या होत असताना ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत त्याचं काय? हा मोठा प्रश्न सर्वांनाच भेडसावतो. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जालना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती विद्या कानडे .जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामे सुरू झाली परंतु ती’ जल “बीन” मिशन’ या नावाने जास्त ओळखल्या गेले. त्याचा परिणाम म्हणून बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी श्रीमती विद्या कानडे यांची तक्रार केली . या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती गठीत झाली एकाच कॉन्ट्रॅक्टदाराला 25- 25 30-30 कामे दिल्याचा आरोप आमदारांनी या अभियंत्यावर केला होता. त्या अनुषंगाने दिनांक 28 मार्च रोजी जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी त्रिसदस्य समिती नियुक्त केली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प संचालक जलजीवन मिशन आणि समग्र शिक्षा अभियानाचे लेखाधिकारी हे दोन सदस्य अशा एकूण या तीन सदस्य समितीला पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यानच्या काळात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या घरी काही दुर्घटना घडल्यामुळे ते रजेवर गेले, आणि ते परत येऊन रुजू होण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशिक्षणासाठी गेले आणि मिनियार यांचा पदभार श्री बनसोड यांच्याकडे आला त्यामुळे . ही चौकशी अजूनही प्रलंबितच आहे .आता तर श्रीमती कानडे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे या चौकशीच्या पुढे काय ? चौकशी होणार का ? का प्रकरण बदलांच्या प्रवाहात वाहून जाणार ? का तेरी भी चुप मेरी भी चुप असं झालं आहे ?असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे .कारण करोडो रुपये खर्च करून ही योजना कार्यान्वित होण्यापेक्षा “जलबीन मिशन” असे म्हणूनच चर्चेत आली होती.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विपुल रमेशराव भागवत यांची बीड जिल्हा परिषदेत याच पदावर बदली करण्यात आली आहे .तसेच जालना पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी असावरी हरिश्चंद्र काळे या प्रसूती रजेवर गेल्या होत्या आणि त्यांची आता उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग हिंगोली येथे बदली करण्यात आली आहे.
https://youtube.com/@edtvjalna5167
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
www.edtvjalna.com दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२