जालना- एक लाख रुपयांचे एक कोटी करून देतो असे आमिष दाखवणाऱ्या जालना येथील रतन आसाराम लांडगे वय 45 राहणार भक्तेश्वर नगर जालना याला तालुका जालना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता जादूटोणा, अघोरी प्रथा करण्याचे साहित्य सापडले आहे.
धुळे जिल्ह्यातील फेरजापूर येथील शेती व्यवसायिक किशोर पंडित शेवाळे व 48 वर्षे यांना आरोपी रतन आसाराम लांडगे यांनी एक लाख रुपयांचे एक कोटी रुपये करून देतो असे आमिष दाखवले. त्या बदल्यात त्याने तीन लाख रुपये आणि किशोर शेवाळे यांच्या पुतण्याकडून अडीच लाख रुपये घेतले. त्या दोघांना लांडगे यांनी स्वतःच्या घरी बोलावून जादूटोण्याचे प्रयोग करून दाखविले. प्रत्यक्षात मात्र साडेपाच लाख रुपयांचे साडेपाच कोटी रुपये दिलेच नाहीत .त्यामुळे किशोर शेवाळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला .या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सरकारी पंचांसमक्ष रतन लांडगे यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी रतन लांडगे यांच्या सोबतच पद्मनाभ जयप्रकाश राणे व 41 वर्ष व्यवसाय निर्माता राहणार द नेक्स्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मुलुंड पश्चिम मुंबई ,विकास वसंत अनुभवणे वय 41 वर्ष कोकण नगर भांडुप पश्चिम मुंबई आणि नारायण गजानन जोशी वय 52 वर्ष चहा टपरी चा व्यवसाय राहणार साई प्लाझा बिल्डिंग रूम नंबर 11 विरार पश्चिम मुंबई हे प्रत्येकी एक लाख रुपये घेऊन आलेले पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यांना तीन करोड रुपये करून देण्याचे आमिष दाखवले होते .दरम्यान पोलिसांनी छापा मारला त्यावेळी रतन लांडगे यांच्या घरात एक लोखंडी जाळीचा पिंजरा, एक लाकडाची विना, पितळाची मोठी समई, काळ्या रंगाच्या भालूचा मास्क, एक चामड्याची मॅट ज्यावर वाघाचे चित्र आहे ,प्लास्टिकची मानवी कवटी, दोन पाय व दोन हात पाच बोट असलेला प्लास्टिकचा पंजा, स्टीलचा हळदीकुंकवाचा पंचपाळ ,काळ्या रंगाची कपड्याची बाहुली, स्टीलचा कोयता ज्याची मूठ अखंड असून त्यावर घोड्याचे चिन्ह आहे यासह तीन पांढऱ्या गोण्या ज्या गोण्यामध्ये नोटांच्या आकाराचे कापलेले कोऱ्या कागदाचे बंडल त्यातील एका गोणीमध्ये 16 बंडलवर प्रत्येकी एक पाचशे रुपयांच्या दराची नोट लावलेली होती. पोलिसांनी रतन लांडगे याला पकडल्यानंतर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि एक लाख 49 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
पार्श्वभूमी रतन आसाराम लांडगे हा नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत असे .गरजू आणि गरीब कुटुंबांकडून 2100 रुपये भरून घेऊन त्यांच्या मुलीच्या लग्नाला 50 हजार रुपये देण्याचे आम्हीच तो दाखवत असे. सन 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून देखील रतन लांडगे यांनी निवडणूक लढवली होती. दरम्यान तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रतन लांडगे याचे खानदेश ,मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात एजंट होते आणि ते एजंट अशा गरजू माणसांना जाळण्यात आणत होते.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२