जालना -ज्ञान संजीवनी फाउंडेशनच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिल्या जाणार असून मराठवाड्यातील एकमेव अत्याधुनिक प्रयोगशाळा ,क्रीडाक्षेत्र, संगीत त्यासोबत अनुभवी शिक्षक वृंद असलेली एकमेव शाळा असल्याचा दावा या संस्थेचे संचालक बळीराम बागल यांनी केला आहे.

“मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान पाच एकर जागेवर या शाळेची सुसज्ज इमारत आहे .विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, टर्फ , रंगीबेरंगी वर्गखोल्या ,प्रयोगशाळा ,एवढेच नव्हे तर प्रत्यक्षात शिक्षण देण्यासाठी असलेले साहित्य इथे उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही तर व्यवहारावर आधारित ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊनच शाळेच्या बाहेर पडता येईल अशी व्यवस्था केली आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांना इथे दुचाकी, चार चाकी, वाहन दुरुस्ती, महिलांना शिलाई मशीन, यासारखे व्यवसायाचे शिक्षण देखील इथे दिला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इतर संस्थांमध्ये एक तपचा  प्रचंड अनुभव असलेले शिक्षक देखील इथे विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. विज्ञानासोबत अध्यात्म, खगोलशास्त्र याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील इथे वाव आहे म्हणूनच अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी टेलिस्कोप देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी शाळा आहे असा आमचा दावा आहे.” असे मत संजीवनी हॉस्पिटलचे तथा ज्ञान संजीवनी फाउंडेशनचे संचालक बळीराम बागल यांनी व्यक्त केले.

             FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version