जालना- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालनाअणि कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पस ता.बदनापूर जि.जालना यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.26 जून, 2025 रोजी कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पस, जालना – छत्रपती संभाजीनगर रोड  बदनापूर जि.जालना  येथे सकाळी १० ते दु. ४ वाजेपर्यंत“पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ” आयोजित करण्यात आला आहे. यासाठी १ हजार ८७ पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध आहेत.

रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळाव्याचेआयोजीत करण्यात येत आहे.या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकितकंपन्या व नियोक्ते उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 1087 रिक्तपदे एसएससी, एचएससी, कोणतेही पदवीधर, आयटीआय ट्रेडधारक (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिष्ट, अप्रेन्‍टीस ट्रेनी, अकाउंटंट असिस्‍टंट, डाटा एन्‍ट्री ऑपरेटर, सर्व्हिस अॅडव्‍हायझर इत्यादी) 18 ते 45 वयोगटातील पात्रताधारकउमेदवारांसाठी पदे उपलब्ध झालेली आहेत.


तसेच या मेळाव्यात स्वयंरोजगारा बाबत अर्थसहाय्य करणा-या विविध शासकीय महामंडळाचे स्टॉल लावण्यात येणार असुन विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच बरोबर स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना अंतर्गत विनामुल्य असलेले विविध रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची माहिती देऊन नोंदणी करण्यात येणार आहे. या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुषउमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच, उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाचप्रतीत बायोडाटा व फोटो आणि आधारकार्ड,सेवायोजन नोंदणी कार्ड, इ. कंपनींना देण्यासाठी सोबत ठेवावे.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापर्यतसेवायोजन नोंदणी केली नसल्यास WWW.rojgar.mahaswayam.gov.in यासंकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोदणीकेली असल्यासवरील रिक्तपदे व पात्रते प्रमाणे मॅचिंग होणा-या पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करुन लॉगीन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 09 वाजता उपस्थित राहावे. अधिकमाहितीसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन आगामी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या सदराखालील जालना जिल्हा निवडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावायामधील तपशिल पाहावा. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा.

             FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version