जालना-बनावट सातबारा तयार करून त्यावर बनावट पीक पेरा दर्शवून २०९३ क्विंटल जास्तीच्या सोयाबीनच्या पीक पेऱ्याची नोंदणी करत तब्बल १ कोटी २ लाख ३९ हजार रुपये किमतीच्या सोयाबीनची विक्री करत राज्य सरकारला चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड या गावात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी जालन्याचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिसांनी विर छत्रपती सुक्षशित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील संचालक आणि व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामध्ये 1)भागवत सुदाम दौड, 2) सुनिल शिवाजी शिंदे, 3) अनिल शिवाजी घुले,4) सुरेश कैलास सोनवणे, 5) रमेश ठकुबा गायकवाड, 6) कृष्णा साईनाथ गायकवाड,7) गोपीनाथ कौतीक दौड, 8) सचिन भगवान दौड, 9) कृष्णा सुभाष आन्वेकर सर्व रा -जानेफळ गायकवाड, ता-भोकरदन जि-जालना,10) पवन वाघ  रा-वरुड बु., ता-भोकरदन, जि-जालना यांचा समावेश आहे.पारध पोलिस ठाण्याचे सपोनि एस.डी.माने हे पुढील तपास करत आहेत.

                     FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
   *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version