जालना- शेती विषयक अनुदान वाटप हा पूर्णपणे महसूल विभागाचा विषय आहे. त्यामुळे या अनुदान वाटपाशी ग्रामसेवकांचा काहीच संबंध नाही. असे असतानाही एका सरकारी कर्मचाऱ्याची दुसऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला मदत म्हणून शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्रामसेवकांनी तलाठ्याला मदत केली. खरंतर ग्रामसेवकाचे कार्यक्षेत्र हे गावअंतर्गत असते आणि गावच्या बाहेरचे कार्यक्षेत्र हे महसूल विभागाचे असते आणि शेती अनुदान वाटप हे देखील गावच्या बाहेरच आहे, त्यामुळे त्याच्याशी ग्रामसेवकांचा काहीही संबंध नाही. परंतु अनुदान वाटपात झालेला घोटाळा झाकण्यासाठी आणि “मी नाही त्यात……. “असे म्हणण्यासाठी ग्रामसेवकांवर आरोप केला गेले आहेत. असं मत ग्रामसेवक व्यक्त करीत आहेत. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत आत्तापर्यंत 37 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. यामध्ये पुन्हा आता वाढ झाली आहे आणि आणखी सात ग्रामसेवकांना म्हणजेच एकूण 45 ग्रामसेवकांना या नोटिस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान पूर्वीच्या 37 ग्रामसेवकांवर 4 कोटी 72 लाख 32 हजार 977 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस मध्ये करण्यात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये उघडकीस आलेला हा एकूण घोटाळा 45 कोटींच्या सुमारास आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिसांना ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत खुलासे देखील पाठवले आहेत. या सर्व खुलासांमध्ये एकाही ग्रामसेवकाने अपहार केला नाही असे सविस्तर पत्रच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने दिले आहे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२