जालना- शासनाने बदलीचे आदेश काढून एक महिना उलटला तरी देखील जालन्याच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना खुर्ची सोडावीसे वाटेना ,का ?का जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ त्यांना सोडण्यासाठी इच्छुक नाहीत अशी चर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरू झाली आहे. आता जर हे अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत तर शासनाच्या निर्णयानुसार त्यांचा तो अकार्य दिन म्हणून गणला जाईल, कामाचा दिवस समजला जाणार(Dies Non) नाही. म्हणजेच कदाचित ते बिनपगारी म्हणून काम करतील असा होऊ शकतो.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील गट -अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सन 2025 या वर्षातील सर्वसाधारण बदलांचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव लतिका पाटील यांनी दिनांक 6 जून 2025 रोजी काढले. या एका आदेशामध्ये 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्येच जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीचे जिल्हा नियोजन अधिकारी सु.तू. सूर्यवंशी यांची छत्रपती संभाजी नगर येथील मानव विकास आयुक्तालयात रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्त (मानव विकास) या पदावर बदली करण्यात आली आहे .सहा तारखेला निघालेले हे आदेश आज 5 जुलै आहे म्हणजेच एक महिना झाला आहे तरीदेखील संबंधित अधिकारी हे आपल्या नियोजित पदस्थापनेवर गेले नाहीत. दरम्यान त्यांच्या काळात जालन्यात उभारलेल्या नवीन नियोजन भावनांच्या इमारतीच्या संदर्भात चौकशी देखील सुरू असल्याचे समजते. कारण नऊ कोटीची प्रस्तावित इमारत 25 कोटी पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तरी देखील या इमारतीचे काम गुणवत्ता पूर्ण न झाल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि या कामाची बाह्य यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशा सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे कदाचित या सर्व चौकशीचे “नियोजन” करण्यासाठीच ते थांबले असावेत अशी शक्यताही वर्तवली जात आहे. याच बदलीच्या आदेशामध्ये असेही सूचित केले आहे की ,महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी नियम 1981 मधील नियमानुसार अनुद्नेय पदग्रहण अवधीतच ,बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी ,अन्यथा या पदग्रहण अवधित बदलीच्या पदावर रुजू न झाल्यास त्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non)म्हणून गणला जाईल .
जिल्हा नियोजन अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या अधिकारी ची नियुक्ती झाली नसेल तर या पदाचा पदभार उपसंचालक गट-अ (राजपत्रित) संवर्गातील “जिल्हा नियोजन अधिकारी” व “जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास )”ही पदे काही काळ रिक्त असल्यास त्याचा अतिरिक्त कार्यभार या दोन पदांपैकी ज्या पदावर अधिकारी कार्यरत आहे त्याच्याकडे जिल्हाधिकारी यांनी तात्पुरत्या स्वरूपात सोपवावा. तथापि जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी( मानव विकास) ही दोन्ही पदे एकाच वेळी रिक्त झाल्यास त्यांचा अतिरिक्त कार्यभार जेष्ठतेप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी किंवा सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) यांच्याकडे जिल्हाधिकारी यांनी तात्पुरत्या स्वरूपात सोपवावा असे स्पष्ट मार्गदर्शन प्रज्ञा महाले उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 एप्रिल 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकात दिलेले आहे .असे असतानाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे श्री. सूर्यवंशी यांना का कार्यमुक्त करत नाही ?का सूर्यवंशी यांनाच खुर्चीचा मोह सुटत नाही याविषयी जिल्हाधिकारी परिसरात आता चर्चा सुरू झाली आहे.
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
*दिलीप पोहनेरकर * ९४२२२१९१७२