जालना- दुय्यम निबंधक कार्यालयाचा अकृषिक परवाना घेतलेला नसताना गुंडेवाडी शिवारात भूखंड पाडून विक्रीकेली.या प्रकरणी बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव येथील शेख मुस्ताक शेख अमीर यांना तालुका पोलिसांनी सोमवार दिनांक 3 रोजी अटक केले होते .न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

जिल्ह्यामध्ये बनावट अकृषिक परवाना दाखवून छोटे छोटे भूखंड विकल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 12 आणि 26 जून रोजी दोन वेळा वेगवेगळ्या बैठका घेऊन अशा बनावट भूखंड विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार या मोहिमेमध्ये शेख मुस्ताक शेख अमीर यांनी जालना तालुक्यातील कुंभेफळ शिवारामध्ये गट नंबर 91 आणि 67 मध्ये बनावट अकृषिक परवाना दाखवून शेतजमिनीचे बेकायदेशीर भूखंड पाडून लोकांना विकले. दिनांक 21 सप्टेंबर 2012 ते दिनांक पाच एप्रिल 2020 च्या दरम्यान ही खरेदी विक्री झाली. या प्रकरणी दुय्यम निबंधक विभाग एक चे कनिष्ठ लिपिक सुधाकर आनंदराव बोधगिरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शेख मुस्ताक शेख अमीर याने 154 बनावट भूखंड विकल्या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 420, 465 ,467 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता, तसेच शासन नियमानुसार या शेतजमिनीचे भूखंड पाडून विक्री करणे कायदेशीर दृष्ट्या शक्य नसल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.
याचा तपास करत असताना आरोपी शेख मुस्ताक याला तीन तारखेला तालुका पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते आणि चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे त्यामुळे न्यायालय आज पुन्हा का निर्णय देते याकडे या भूखंड खरेदीदारांचे लक्ष आहे.
https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
www.Edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172