जालना- रस्त्यावर चालत असताना एका विशिष्ट टाळीचा आवाज आला की माणसाचे कान टवकारले जातात आणि त्या आवाजाच्या दिशेने पाहिल्यानंतर नाकही मुरडतो त्यांची खिल्लीही उडवतो. त्या तृतीयपंथीयांचा अपमान करणारा असा हा आपला सुसंस्कृत समजल्या जाणारा समाज. परंतु शासनाने आता या तृतीयपंथीयांनाही सन्मानाने वागणूक देण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2020 मध्ये शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार या तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती गठीत करण्यात आले आहे. याची एक बैठकही मागील महिन्यात पार पडली आज या तृतीयपंथीयांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी एक कार्यशाळा ही झाली. त्यांची आरोग्य तपासणीही केल्या गेली.

 

या तृतीयपंथीयांना समाजाकडून मान-सन्मान मिळावा, त्यांनाही स्त्री-पुरुषा एवढाच समान अधिकार असावा ,या हेतूने ओळखपत्र, आधार कार्ड या सर्व सुविधा देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांना हक्काचे घरकुल ही मिळणार आहे. सद्य परिस्थितीत हे तृतीय पंथीय आपापल्या परीने मिळेल तिथे विखरून राहत आहेत. आता त्यांना शासनाचे घरकुल मिळण्याचा रस्ता मोकळा झाला. खरंतर हा प्रश्न फार मोठा नाही. खरा प्रश्न आहे तो यांच्या अंत्यसंस्काराचा. तृतीयपंथीयांचा अंत्यसंस्कार करायचा कसा? कुठे? कोणत्या स्मशानभूमीत? कोणत्या कब्रस्तानात? कोणत्या धर्मानुसार? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात . त्यामुळे पूर्वी अशा तृतीयपंथीयांचा कोणताही गाजावाजा न करता अंत्यसंस्कार केल्या जायचा. परंतु आता हा समाज देखील सुशिक्षित झाला आहे. त्यामुळे शरीराने जरी हे तृतीयपंथी असले तरी त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे काहीजण आपल्या आई-वडिलांकडे राहतात ,काही आई-वडील आपल्या मुलांकडे राहतात. कोणी स्वतंत्र राहते. मग प्रश्न असा आहे की हे तृतीयपंथी आहेत तर यांना घर-दार मूळ -बाळ कशी? खरंतर फक्त टाळी  वाजविण्यावरून  तृतीयपंथी होत नाहीत. तर काही प्रथेमुळे देखील समाज त्यांना तृतीयपंथी समजतो. काहींना देवीला सोडल्यामुळे त्यांना तशी वेशभूषा करून आयुष्य जगणे भाग पाडते. परंतु त्यांना घरदार , पत्नी मुलं या सर्व गोष्टी असतात. अशांचा अंत्यसंस्कार त्यांच्या धर्माप्रमाणे रितीरिवाजप्रमाणे केल्या जातो. ज्यांना मागेपुढे कोणी नाही त्यांचा अंत्यसंस्कार ते ज्या समाजातून आले आहेत. त्यांचे नातेवाईक कोणत्या प्रकाराने अंत्यसंस्कार करायचा सांगतील त्या पद्धतीने, त्या समाजानुसार दफनविधी किंवा अग्निसंस्कार केले जातात. त्यामुळे यांच्या अंत्यसंस्कारावरून तर्क वितर्क लावले जात होते परंतु आता कुंबेफळ कडे एकाच ठिकाणी दोन एकर जागा स्मशानभूमीसाठी तर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला घरकुल साठी जागा देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. अधिक माहिती पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी बातमी दिलेला व्हिडिओ पहा.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

 

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version