जालना-लाचखोरी मध्ये नवीन नवीन फंडे उघडकिस यायला लागले आहेत . लाचघेतल्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने पोलीस देखील आता “डिस्काउंट” ची भाषा करायला लागले आहेत .मंठा पोलीस ठाणे जिल्हा जालना मध्ये पोलीस निरीक्षक आणि एका पोलिस अंमलदाराला लाच घेताना पकडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मंठा तालुक्यात अवैध वाळूची सरास विक्री होत असल्याचे प्रकार काही नवीन नाहीत आणि पोलिसांसोबत वाळू वाल्यांचे संबंधही नवीन नाहीत .परंतु जेव्हा अतिरेक होतो त्यावेळेस अशा गोष्टी उघडकीस होतात. या प्रकरणातील एका अवैध वाळू वाल्याचे टिप्पर चालू होते. हे टिप्पर चालू ठेवण्यासाठी त्याच्याकडून मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी एका महिन्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार हा सौदाही ठरला त्यापैकी दहा हजार रुपये देखील त्यांनी घेतले. उर्वरित चाळीस हजार रुपये हे तक्रारदाराची पोलीस अधिकाऱ्याला देण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे त्याने थेट छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क केला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष तक्रारीची गुरुवार दिनांक 12 रोजी शहानिशा केली. यावेळी पोलीस अंमलदार रवी जाधव यांनी पोलीस निरीक्षकासाठी पन्नास हजार रुपये आणि स्वतःसाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी दहा हजार रुपये रात्रीच घेऊन टिप्पर सोडून दिले .त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी तक्रारदाराकडे दोन टिप्पर पकडून दिल्यास मासिक हप्त्यामध्ये सूट देऊ असे सांगितले. सापळ्याची शहानिशा करत असताना दहा हजार रुपये पूर्वीच घेतल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित 40 हजार रुपयांसाठी तोडजोड करून तीस हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम पोलीस अंमलदार रवी राठोड यांनी पोलीस ठाणे मंठा येथे असलेल्या गोपनीय शाखेत गोपनीय पद्धतीने घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष तीगोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणातील आरोपी क्रमांक एक रवी गणपत जाधव पोलीस अंमलदार मंठा पोलीस ठाणे, वर्ग तीन, राहणार पोलिसांची निवासस्थाने रूम नंबर 200 जालना, आरोपी क्रमांक दोन पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड वर्ग एक मंठा पोलीस ठाणे राहणार उल्कानगरी घर नंबर 224 छत्रपती संभाजी नगर हल्ली मुक्काम तळणी फाटा मंठा या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मनोजकुमार राठोड हे यापूर्वी जालना येथे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गृह विभागाचे उपअधीक्षक म्हणून देखील काही दिवस काम केले आणि त्यानंतर त्यांची मंठा येथे बदली झाली होती.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172