जालना-जालना शहरातील व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक जिचे नाव नंतर बदलून मोतीराम अग्रवाल मर्चंट कॉपरेटिव्ह बँक असे झाले आहे. या बँकेच्या समोर काल रात्रीपासूनच ठेवीदार ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे या बँकेचे दिवाळी निघाले? का दुसऱ्या बँकेत विलीनीकरण होणार? याविषयी सहकार क्षेत्र आणि बँकेच्या ग्राहकांमध्ये तर्क वितर्क लावले जात आहेत. निर्णय काही जरी असला तरी काल रात्रीपासूनच बँकेसमोर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे .आज बँकेची वेळ होऊन गेल्यानंतर देखील बँक उघडली नव्हती. बँकेच्या संचालक मंडळाकडून देखील अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान जून महिन्यामध्ये भारतीय रिझर्व बँकेने या बँकेला सहा लाख दंड ठोठावला होता आणि संचालक मंडळातील काही संचालकांचे राजीनामे ही घेतले होते . या संदर्भातील बातमी दिनांक 24 जून रोजी Edtv News ने प्रकाशित केली होती .एकंदरीतच या बँकेत अनागोंदी कारभार चालू होता त्यामुळे कर्ज वसुली देखील मोठ्या प्रमाणात थकली होती. या सर्वांचा परिपाक आता दिसायला लागला आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172