जालना – जालना जिल्ह्यातील एकूण 962 गावांपैकी फक्त पाचच गावांची स्वगणना शंभर टक्के पूर्ण झाली आहे एकूण चार तालुक्यामधील पाच गावांपैकी मंठा तालुक्यातील 117 गावांपैकी मोहदरी व इंचा या दोन गावांची स्व गणना 100% झाल्यामुळे मंठा तहसील कार्यालय जालना जिल्ह्यात आज तरी अव्वल ठिकाणी आहे. ही स्व-गणना पूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस बाकी आहेत.

जालना जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुक्यांमध्ये 962 गावे आहेत. सुमारे 13 लाख लोकसंख्या आहे. एका परिवारात चार सदस्य अशी सरासरी धरली तर तीन लाख 25 हजार कुटुंबप्रमुख होतात. या स्वगणनेमध्ये फक्त कुटुंबप्रमुखांनीच सर्व माहिती भरून द्यायची आहे त्या अनुषंगाने झालेली स्व-गणना ही अत्यल्प आहे. आज पर्यंतच्या आकडेवारीनुसार पोर्टलवर किंवा वेबसाईटवर एकूण 17,466 कुटुंबाप्रमुखांनी माहिती भरली, त्यापैकी 15,325 कुटुंबप्रमुखांची माहिती परिपूर्ण झाली, उर्वरित 2114 कुटुंबप्रमुखांची माहिती ही अद्यावत होणे बाकी आहे. 

जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यातील प्रत्येकी एक गाव तरी शंभर टक्के स्व-गणनेमध्ये पूर्ण होणे वरिष्ठांना अपेक्षित होते. परंतु आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार मंठा तालुक्यातील मोहदरी व इंचा ही दोन गावे, परतुर तालुक्यातील तोरणा जालना तालुक्यातील तांदुळवाडी आणि बदनापूर तालुक्यातील मौजे मेहुना या गावांची 100% स्व-गणना पूर्ण झालेली आहे. उर्वरित जाफराबाद भोकरदन अंबड आणि घनसावंगी या चारही तालुक्यांमध्ये एकाही गावांमध्ये 100% स्व-गणना झालेली नाही.

उर्वरित दोन दिवसांमध्ये कुटुंबप्रमुखांनी आपली स्वगणना https://census.gov.in या वेबसाईटवर ,ॲप च्या माध्यमातून पूर्ण करावी, त्यामुळे आपला आणि नंतर आपल्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल. त्याचसोबत जनगणना करताना काही अडचण आली तर 18 55 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version