जालना- जालना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जालना तालुक्यातील अनेक रस्ते हे फक्त कागदावरच केले होते. लाखो रुपयांचे बिल उचलून एक रुपयाचेही काम केले नव्हते. हा सर्व प्रकार Edtv News ने दिनांक 12 जूनला इंदेवाडी ते शिरसवाडी या ग्रामीण मार्ग क्रमांक 79 च्या बोगस काम संदर्भात बातमी लावली होती. आणि एक रुपया देखील खर्च न करता 18 लाख रुपयांची बिल उचलले हे हे पुराव्यासह दाखवले होते. 

या बातमीची दखल घेऊन जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी देखील त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष कामांची पाहणी केली होती. त्यांनी पाहणी करण्याचा उद्देश म्हणजे या सर्व रस्त्यांचा निधी हा जिल्हा नियोजन विकास कार्यक्रमांतर्गत दिला गेलेला आहे. त्याचसोबत जालना जिल्हा परिषदेचे नवीनच बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कांत कनवारिया यांना देखील या सर्व प्रकरणाची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे आणि, रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री .पवार यांच्यासमोर पुरावे सादर करून ही माहिती दिली होती.   

त्यातच रस्ते न झाल्यामुळे इंदेवाडी च्या ग्रामस्थांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमुळे ईडी टीव्ही न्यूज ने ज्या इंदेवाडी ची आणि कडवंची या दोन्ही गावच्या रस्त्यांची बातमी लावली होती त्या गावांमध्ये रातोरात रस्त्याचे कामे सुरू झाली. ही कामे होत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्या अनुषंगाने या प्रकरणाला गती आली.   त्यानंतर जालना जिल्ह्यात झालेल्या मागील तीन वर्षांच्या कामाच्या चौकशीसाठी  दहा पथकेही तयार करण्यात आली होती. या पथकांची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सविता सालगर यांना प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.

या आदेशाच्या अनुषंगाने श्रीमती सलगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता EDTV NEWS च्या बातम्यांमध्ये शंभर टक्के तथ्य असल्याचे आढळून आले. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुरजकुमार मोहनलाल हरणे आणि शाखा अभियंता अनिल देविदास इंगळे या दोघांना कामामध्ये दिरंगाई करणे ,शासनाचे आर्थिक नुकसान करणे, यासह अन्य काही कारणे दाखवून आपला अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. या अहवालाची दखल घेत जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कांत कानवारिया यांनी सुरज हरणे आणि अनिल इंगळे या दोघांनाही निलंबित केले आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version