जालना -शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मोदीखाना भागात महाकाली देवीचे मंदिर आहे. दीडशे वर्षांपूर्वी आयर समाजाने चंदनाच्या भुसावर कपड्याचा लेप देऊन ही मूर्ती स्थापन केली होती परंतु कपडा जीर्ण झाल्यामुळे नंतर ही मूर्ती चांदीच्या धातूमध्ये तयार करून स्थापित करण्यात आली आहे. मुख्य महाकाली मूर्तीच्या दोन्ही बाजूला समाजानेच स्थापन केलेल्या अन्य दोन देवता देखील येथे आहेत.

150 वर्षांपूर्वी हे मंदिर पद्मशाली अर्थात तेलुगु समाज याची देखभाल दुरुस्ती करत होते. मात्र बदल होत- होत आता या मंदिराचे संस्थांनमध्ये रूपांतर झाले आहे आणि आता विश्वस्त त्याचा कारभार पाहत आहेत.

मंदिराला कायमस्वरूपी कोणतेही उत्पन्न नाही. परंतु मध्यवस्तीत आणि सामान्य माणसांच्या परिसरात हे मंदिर असल्यामुळे भाविकांनी दिलेल्या दानावर या मंदिराचा कारभार चालत आहे.

कोरोनामुळे या मंदिराच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. भाविक येणेच बंद झाल्यामुळे उत्पन्नच बंद आहे. त्यामुळे मंदिराची दिवाबत्ती, देखभाल-दुरुस्ती देखील मंदिराच्या विश्वस्तांना भाविकांकडून मदत मागून किंवा स्वतःच्या खिशातून करावी लागत आहे.

मध्यमवर्गीय वस्तीत हे मंदिर असल्यामुळे सहाजिकच या मंदिरावर श्रद्धा असणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे. भाविक सकाळी कामाला जाण्यापूर्वी महाकालीच्या समोर माथा टेकवायला चुकत नाहीत, आणि शक्य तेवढे दानही पेटीत टाकतात. आता ना भाविक, ना दान त्यामुळे मंदिराचा खर्च चालवायचा कसा? हा मोठा प्रश्न आहे .मंदिर जुने नाही परंतु नवीन पद्धतीनुसार यामध्ये सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे अशा शुशोकरणाची वारंवार दुरुस्ती करावी लागते. सद्यपरिस्थितीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पडलेल्या संततधार पावसामुळे मंदिराचे छतही गळायला लागले आहे. आणि सिलिंग पडली आहे मात्र निधीअभावी ही दुरुस्ती देखील रखडली आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version