जालना- दारूचे व्यसन सोडविण्यासाठी भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शनिवारी काही लोक गेले होते. यापैकी गोपाल दवंडे वय 33 वर्षे वयाच्या इसमाचा औषध पिल्यानंतर मृत्यू झाला. या औषधामुळे गोपाल दवंडे यांचा मृत्यू झाल्याच्या  आरोपावरून मृतांच्या नातेवाईकांनी या महाराजांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान आज पारध पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करून पार्थिवाची उत्तरीय तपासणी केली आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे .तडवी बाबा या नावाचे महाराज दारू सोडण्याचे औषध साडेचार हजार रुपयांना देत होते आणि याचाच एक भाग म्हणून त्यांनी दोन ग्लास औषध गोपाल दवांडे यांना पाजले ,ते पिल्या नंतर काही वेळातच गोपाल यांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांनी हा मृतदेह तडवी बाबांच्या घरासमोर आणून ठेवला. जोपर्यंत या महाराजा वर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांना घेतल्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता .आज रविवारी या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तडवी बाबा कालपासूनच फरार झाले आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

 

Share.

Comments are closed.

Exit mobile version