जालना- सदर बाजार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जुन्या मोंढ्याच्या  बाजूला असलेल्या शिवाजी संकुल , दवा मार्केटमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला आहे. ज्यामध्ये तंबाखूचे 12 हजार पाऊच ज्याची किंमत 18500, विमल 1 तंबाखू 20 हजार पाऊच त्याची किंमत तीस हजार रुपये होते .विमल पान मसाला 2420 पाऊस एक बोरी आणि 9 पोते, बाबा 160 तंबाखू, रजनीगंधा असा सुमारे पाच लाख रुपयांचा गुटका आणि 1 लाख रुपयांचे जुने वाहन असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून टाटा कंपनीची झिप मालवाहू गाडी क्रमांक एम एच 20 सिटी 4159 या गाडी मधून गुटका वाहून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये गुटका असल्याचे लक्षात आले. त्यानुसार ही गाडी सदर बाजार पोलिस ठाण्यात आणून लावण्यात आली. या गाडीमध्ये बाबा, विमल, रजनीगंधा, अशा विविध प्रकारचे महाराष्ट्रात विक्रीसाठी बंद असलेले पान मसाले-गुटखे सापडले आहे. याप्रकरणी वाहनाचा चालक मंगेश  राहणार बरवार गल्ली, कादराबाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .ही कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी रामप्रसाद रंगे ,सुभाष पवार, सोमनाथ उबाळे, दिपक घुगे, समाधान तेलंग्रे, रामेश्वर जाधव, धनाजी कावळे यांनी केली.

www. edtv jalna. com.

दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version