जालना -तालुक्यातील गवळी पोखरी शिवारात माळाचा गणपती जवळ असलेल्या दीपक गंडाळ यांच्या शेतातील गोदाम मधून कोंबडी चोराने कोंबड्या सह अन्य साहित्य चोरून नेले आहे. हा कोंबडीचोर देखील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

माळाचा गणपती कडून सिंदखेड कडे जातानाच शेत वस्तीमध्ये शेत तलावा आहे. त्या बाजूला घरे आणि एक गोदाम आहे िथे नेहमीच किरकोळ चोर्‍या होत राहतात ,मात्र काल रात्री झालेल्या चोरीमुळे गंडाळ परिवाराची झोप उडाली आहे .शेडचे पत्तर वाकून चोरट्याने गोदामात प्रवेश केला आणि तिथे असलेले लोखंडी अँगल, वेल्डिंग वेल्डिंग ची मशीन, गव्हाणे भरलेले पोते, आणि तीस गावरान कोंबड्या पळविल्या आहेत. सुमारे 50 हजार रुपयांचा हा माल चोरट्याने पळून नेला. याप्रकरणी दीपक गंडाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version